हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा

0
524

सात आठ मिरच्या धूवून पुसून तुकडे करून घ्यायच्या
लोखंडी तव्यात किंवा कढईत (तवा अथवा कढई लोखंडी असल्यास हा ठेचा अधिक चवदार होतो)
तेल गरम करून त्यात धुवून पुसून घेतलेल्या मिरच्याचे तुकडे घालायचे त्यात दहा बारा पाकळ्या सोललेला लसूण, चार चिरलेल्या कोंथिबीर काड्या आणि मीठ घालून थोडे परतून घ्यायचे
(या चार पदार्था व्यतिरिक्त या पारंपारिक ठेच्यात कशाचीही गरज नसते)

🌵गॅस बंद करून मिश्रण जरा गार झाले की त्याच तव्यात बत्ता अथवा वरवंटा वापरून चांगला खरडून घ्यायचा
(तव्यात खरडून घेणे असाच वाक्प्रचार आहे)

🌵हा ठेचा थोडा जाडसर हवा
चटणी सारखा बारीक नाही वाटायचा
वरवंटा अथवा बत्ता नसेल मिक्सरचाही वापर करू शकता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here